ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वजन वाढविण्यासाठी कच-यात भरली माती, नगरसेविकेने आणला प्रकार उघडकीस

चिंचवड, दि. २६ - पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणा-या ठेकेदाराने वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये चक्क माती भरल्याचा धक्कादायक प्रकार आज (गुरुवारी) उघडकीस आला. निगडीच्या नगरसेविका कमल घोलप यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. मातीने भरलेला डंपर महापालिकेत आणला आहे.

घरोघरचा कचरा गोळा करणारा (एम.एच १२, आरए ९००३) हा डंपर निगडी, ओटास्कीम येथून वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून माती भरत होता. हा प्रकार नगरसेविका कमल घोलप यांच्या निदर्शनास आला. गुरुवारी कचरा गोळा करणारे कर्मचारी निगडी येथे डंपरमध्ये माती भरत होते.

कमल घोलप यांनी त्यांच्याकडे डंपरमध्ये माती का भरतात, असे विचारले असता. त्यांनी गोलमाल उत्तरे दिली. त्यानंतर हा डंपर त्यांनी महापालिकेत आणला आहे. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, आरोग्य अधिकारी मिनीनाथ दंडवते यांना या प्रकरणाची त्यांनी माहिती दिली आहे.

डंपरमध्ये ७० टक्के माती भरली जाते आणि दाखविण्यासाठी वरती थोडा कचरा टाकला जातो. वजन वाढविण्यासाठी ठेकेदाराने डंपरमध्ये विविध जड वस्तूही ठेवल्या होत्या. '' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत परिसरातील घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी सहा गाड्या आहेत. या ठेकेदारावर कडक कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच या डंपरचे वजन किती आहे, याची माहिती घेऊन त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्याची मागणी, नगरसेविका कमल घोलप, नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.