ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तैलचित्र अनावरण सोहळ्याला शिवसेना नेत्यांना निमंत्रित करा - राहुल कलाटे

चिंचवड, दि. २७ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याला ठाकरे कुटुंबियांतील महत्वाची व्यक्ती अथवा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख पालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी महापौर आणि आयुक्तांकडे केली आहे. याबाबत कलाटे यांनी महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे दैवत होते. आजही त्यांच्याबद्दल तमाम जनतेच्या मनात आदराची भावना आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याला ठाकरे परिवारातील महत्वाची व्यक्ती अथवा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करावे.

अनावरण सोहळ्यास आणखी दोन दिवसांचा अवधी आहे. तत्पूर्वी कार्यक्रमात फेरबदल करून ठाकरे कुटुंबिय अथवा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्याची मागणी, राहुल कलाटे यांनी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याला शिवसेनेच्या नेत्यांना बोलविण्याची मी वारंवार महापौर काळजे यांच्याकडे विनंती केली होती. तसेच सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनाही कल्पना दिली होती. परंतु, भाजपकडून श्रेय लाटण्यासाठी याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शिवसेनेच्या नेत्यांना डावलण्याचा तैलचित्र अनावरणाचे राजकीय श्रेय घेण्याच्या भाजपच्या पदाधिका-यांचा हा अंत्यत घ्रृणास्पद प्रकार आहे. तसेच तैलचित्र अनावरण सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचेही आम्हाला निमंत्रण दिले नव्हते. भाजपच्या या कृत्याचा आपण जाहीर निषेध करत असल्याचे, राहुल कलाटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.