ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तळेगावमधील दरोडा तसेच पोलिसांवर हल्ला करणारे सहा आरोपी ताब्यात

तळेगाव, दि. २९ - तळेगाव येथील लोढा स्कीम येथील दरोडा तसेच पोलिसांच्या अंगावर गाडी घालणे या दोन गंभीर गुन्ह्यात दोषी असणा-या सहाही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. यामधील तीन अल्पवयीन मुलांना निगडी पोलिसांनी शनिवारी (दि.२७) सकाळी अटक केली. 

यातील अरबाज बशीर शेख (वय १९ रा.गहुंजे), हुसेन हमीद सैयद (वय २० रा.थॉमस कॉलनी, देहुरोड), अनिकेत बैदु भोसले (वय २२रा. मामुर्डी) अशी तळेगाव पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून आय टेनही कार जप्त करण्यात आली. तळेगावचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीष दिघावर, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी.बी. बाजीगीरे, पोलीस हवालदार प्रशांत पुणगे, प्रकाश वाघमारे, नितीन गार्डी, पोलीस नाईक जयराज पाटणकर आदींनी ही कारवाई केली. 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तळेगाव येथील लोढा स्कीम जवळ २५ एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास गाडी खराब झाल्याने थांबलेल्या गाडीवर वरील सहा आरोपींनी दुचाकीवर येवून सशस्त्र दरोडा टाकला होता. त्यानंतर त्यांचा तळेगाव पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपींनी पोलिसांच्याच अंगावर गाडी घातली होती. दरम्यान, शनिवारी निगडी पोलीस गस्त घालत असताना तीन अल्पवयीन मुले निगडी नाका येथून संशयितरित्या जाताना दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.तर तळेगाव पोलिसांनी शनिवारी पाठलाग करुन इतर तीन आरोपींना देहुरोड येथून अटक केली.