ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

देहुरोड ते निगडी दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी जुन्या झाडांची उघडपणे कत्तल

चिंचवड, दि. ३० - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अंतर्गत निगडी ते देहु या रस्त्यांचे चौपदरीकरण चालू आहे. या रुंदीकरणात स्थानिक वड, चिंच यासारखी २६१ वृक्षांची कत्तल होणार आहे. देहुरोड ते निगडीदरम्यानची यासाठी शहरातील अनेक पर्यंवरण प्रेमी सामाजिक संस्थानी विरोध केला होता. मात्र हा विरोध लक्षात घेता प्रशासासनाने चक्क काल (दि.२९) रात्री चिंचेची तीन जुनी झाडे तोडली. यासाठी सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने विरोध करत संबंधित प्रशासानाला विचारणा केली असता त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत.

तीन चिंचेची जुनी झाडे कोणतीही पुर्वकल्पना देता तोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. ही तीन झाडे पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. यावेळी उपस्थितांनी संबंधित कंत्राटदार कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक आर.डी.पाटील एमएसआरडीसीचे प्रकल्प सल्लागार सागर इंदुरे यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला ९० झाडे तोडण्याची परवानगी मिळाल्याचे सांगितले. मात्र त्यांनी तसा कोणताही ठोस पुरावा उपस्थितांना दाखवला नाही. 

देहुरोड-निगडी दरम्यानच्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत रस्ता चौपदरीकरण करण्याचे काम चालू केले आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी निलगीरीची झाडे, रेन ट्रीची १२५ झाडे, कडुलिंबाची ३४ झाडे, जांभूळची झाडे, गुलमोहरची झाडे, बाभुळची झाडे, उंबरचे झाड, वडाची ३६ झाडे, आंब्याची झाडे आणि चिंचेची ४२ अशी अंदाजे २६१ पेक्षा जास्त झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी प्रस्ताव स्टेशन कंमाडन्ट, स्टेशन हेडकॉटर देहुरोड यांच्याकडे सादर केला होता. मात्र या प्रस्तावाल सामाजिक संस्था नागरिकांनी कडाडून विरोध केला होता. यासाठी मानवी साखळी आंदोलन, हरित लवादाकडे तक्रार अशी वेळोवेळी पावले उचलली आहेत. तरीही संबंधित कंत्राटदाराने रात्रीच्यावेळी तीन झाडे तोडली. त्यामुळे नागिकांनी नाराजी व्यक्त केली असून त्यासाठी साखळी आंदोलन करुन वेळेत झाडांची कत्तल थांबवली नाही तर उपोषण करु असा इशाराही <