ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अहिल्यादेवी होळकर यांनी समाजात एकोपा निर्माण करण्याचे कार्य केले - महापौर काळजे

चिंचवड, दि. ३१ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अंगीकारण्यासारखे आहे. त्यांनी त्याकाळी समाजात एकोपा निर्माण करण्याचे महान कार्य केले होते. त्यांचे कुशल प्रशासन, दानिवृत्ती समाजात एकोपा निर्माण करण्याची वृत्ती सर्वांनी स्विकारावी त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे असे प्रतिपादन, महापौर नितीन काळजे यांनी केले. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कला सांस्कृतिक धोरणाअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या महिला महोत्सवातील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास नगरसेविका आशा शेंडगे, स्विनल म्हेत्रे, तळोदे संस्थानचे बाळासाहेब बारगळ, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उपअभियंता विजय भोजने, सरोज राव, माहिती जनसंपर्कचे किशोर केदारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

३० मे २०१७ रोजी कला सांस्कृतिक धोरणांतर्गत महिला महोत्सव २०१७ चे अनुषंगाने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये रांगोळी, पाककला, मेहेंदी फॅन्सी ड्रेस स्पर्धांचासमावेश होता. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोनाली करंजकर हिने, द्वितीय क्रमांक श्रुती हिरवेकर, तृतीय क्रमांक वर्षा -हाटे हिने पटकविला तर अक्षता जानकर हिने उत्तेजनार्थाचे बक्षीस प्राप्त केले. 

पाककला तिखट पदार्थामध्ये प्रथम क्रमांक पुष्पा मोडक, द्वितीय क्रमांक पूनम जाधव, तृतीय क्रमांक माधवी गाडेकर यांनी मिळविला. पाककला गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक शोभा मिरजकर, द्वितीय क्रमांक अर्चना डोंगरे तर तृतीय क्रमांक माधवी गाडेकर यांनी पटकावला. 

मेहेंदी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अंजुम इफ्तेखारी, द्वितीय क्रमांक गुलन्ज सय्यद, तृतीय क्रमांक इशरत मुन्शी हिने पटकावला तर उत्तेजनार्थ बक्षीस जस्मिन पठाण शीतल कसबे यांनी मिळवलेफॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वर्षा -हाटे, द्वितीय क्रमांक सुषमा देसाई यांनी तर तृतीय क्रमांक भक्ती काळे यांनी पटकावला. सूत्रसंचालन सरोज राव यांनी केले.