ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

यमुनानगरमधे महापालिका राबविणार घनकचरा व्यवस्थापन पायलेट प्रोजेक्ट

चिंचवड, दि. १ - पिंपरी-चिंचवड शहराचा स्वच्छ भारत अभियानात कचरा झाल्यावर पालिकेच्या वतीने विविध उपाययोजना हाती घेऊन कच-याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने पालिकेतर्फे निगडी, यमुनानगर येथे 'घनकचरा व्यवस्थापन अलगीकरण पायलेट प्रोजेक्ट' राबविण्यात येणार आहे.

'' क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच घनकचरा व्यवस्थापन अलगीकरण याविषयी स्थानिक नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, नगरसेवक उत्तम केंदळे आणि सचिन चिखले यांच्या पुढाकारातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, '' क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, पर्यावरणतज्ज्ञ विकास पाटील, मोहन गायकवाड संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात एकमेव असणा-या मोशी कचरा डेपोत दररोज तब्बल ७५० टन कचरा जमा होतो. तरीही कच-याची समस्या तशीच आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन वर्षानंतर नवीन कचरा डेपो तयार करावे लागतील. परंतु, प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी जाणून घेतली तर मोठ्या प्रमाणावर हा कचरा कमी होऊ शकतो याची सविस्तर माहिती पर्यावरणतज्ज्ञ विकास पाटील, मोहन गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार हृषीकेश तपशाळकर यांनी बैठकीत दिली.

ओला, सुका घरगुती घातक कच-याचे वर्गीकरण करून त्यांची स्वतंत्र विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातच याचे वर्गीकरण करून तो कचरा आपल्याकडे येणा-या पालिकेच्या वाहनात जमा करावा. यामुळे त्यावर करण्यात येणा-या प्रक्रिया अजून सोप्या होतील. ओला कच-यावर आपण घरातही प्रक्रिया करून त्यापासून खताची निर्मिती करू शकतो. घातक कच-याचे वर्गीकरण केल्यामुळे कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कच-याचे वर्गीकरण करण