ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पत्नीला नांदायला सोडत नसल्याने तरुणाकडून सासऱ्याची हत्या

चिंचवड, दि. ८ - पत्नीला नांदायला सोडत नाही, या रागातून तरुणाने सासऱ्याची हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. आरोपी विनोद सुरवसे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

चिखलीमध्ये राहणाऱ्या विनोद सुरवसेचं पत्नीशी पटत नव्हतं. वारंवार उडणाऱ्या खटक्यांना कंटाळून सहा महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीनं घर सोडलं. बुधवारी विनोद तिला आणायला थेरगावला गेला. मात्र गरड कुटुंबियांनी तिला पाठवण्याचा निर्णय घेतला.

यावरुन झालेल्या वादात विनोदनं सासरे शंकर गरड यांच्यावर चाकूनं हल्ला केला. यात जखमी झालेल्या गरड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाकड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून विनोदचा शोध सुरु आहे.