ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एकाच गुरुचे दोघे शिष्य असलो तरी कामाची भूमिका महत्वाची - पंकजा मुंडे

चिंचवड, दि. ८ - साहेबांना जसे विरोधक त्रास देत तसेच मलाही देतात. उलट एकाच गुरुचे दोन शिष्य असल्यामुळे लढणे अवघड आहे. मात्र, शिष्य एकाच गुरुचे असलो तरी त्यातील कामाची भूमिका महत्वाची आहे, असे नाव घेता राज्याच्या महिला बालकल्याण तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांना टोला लगावला.

वंजारी महासंघातर्फे चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात वंजारी समाजातील पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या समाज बांधवांचा उच्च पदस्थ व्यक्तींच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार महेश लांडगेपिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्यूत हांगे, महाराष्ट्र बारकाऊन्सिलचे अध्यक्ष सुधाकर आव्हाड, पिंपरी- चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, उमा खापरे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गणेश खाडे, माहिला प्रदेशाध्यक्षा स्वाती मोराळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, साहेब गेल्यानंतर बुडत्या जहाजातून उंदीर पळून जावे तसे जवळचे लोक पळून गेले. त्यामुळे जे साहेबांचे शत्रू होते तेच आजही माझे शत्रू आहेत. त्यात आम्ही एकाच गुरुचे शिष्य असल्याने लढणे अवघड आहे. मात्र, यातूनही शिष्य म्हणून योग्य भूमिकाही मांडणे महत्वाचे आहे. यामध्ये केवळ शिक्षण घेऊन उपयोग नाही, असा टोलाही मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना मारला.

तसेच त्यांच्या हस्ते  पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या ५० वंजारी समाजाच्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. यावेली बोलताना मुंडे म्हणाल्या की, आज आपला समाज परीक्षेमध्ये आरक्षण नसताना ५० जागा मिळवतो. ही वंजारी समाजाच्या बुद्धीमत्तेची एकप्रकारे पावतीच आहे. मात्र, एवढे यश मिळवत असताना समाजातील एका तरी गरजूला आधार द्या जेणेकरून तेही तुमच्याप्रमाणे यशस्वी होतील, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी यशस्वी तरुणांचे तसेच वंजारी समाजातील उच्चपदस्थ व्यक्तींचे मानचिन्ह एक रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमामध्ये अपेक्षित उपस्थिती Posted On: 08 June 2017