ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

केएसबी चौकातील ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी लवकरच खुला

चिंचवड, दि. १० - चिंचवड येथील के. एस. बी. चौकातील भोसरी-निगडी या बाजूच्या ग्रेडसेपरटरचे काम पूर्ण झाले आहे. हा ग्रेडसेपरेटर लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती उपअभियंता बीआरटीएसचे प्रवक्ता विजय  भोजने यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत के. एस. बी. चौकात उड्डाणपूल बांधण्यात आला असून याचे यापूर्वीच लोकार्पण झाले. तर, ग्रेड सेपरेटर बांधण्याचे काम सुरू आहे. तर भोसरी-निगडी या बाजूच्या ग्रेडसेपरटरचे काम पूर्ण झाले आहे. या ग्रेडसेपरेटरची लांबी ५०० मीटर असून चौकामध्ये क्लोज्ड बॉक्स बांधण्यात आलेला आहे.

निगडी भोसरीकडील बाजूस प्रत्येकी २०० मीटर लांबीचा ७.५० मीटर रुंदीचा ओपन ग्रेड सेपरेटर बांधण्यात आलेला आहे. या ग्रेड सेपरेटरची उंची .५० मीटर ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे जड वाहने, कंटेनर, ट्रेलर्स यांची वाहतूक सहज होणार आहे. या ग्रेड सेपरेटरमध्ये लँडस्केपिंग करण्यात आले आहे. यामुळे ग्रेड सेपरेटच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे.

भोसरी-निगडी ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर निगडी-दापोडी ग्रेड सेपरेटरचे काम चालू करण्यात येणार आहे, असेही भोजने यांनी सांगितले.