ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रक्ताच्या नात्यापेक्षा शिवरायांच्या विचारांचा आदर्श ठेवा - युवराज संभाजीराजे

चिंचवड, दि. १२ - छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जयजयकार आणि उत्सव साजरा करुन भागणार नाही. तर, शिवरायांचे काम समाजासमोर आणणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांनी गड-किल्ल्यांची केलेली उभारणी आणि त्यांचे काम याचा अभ्यास व्हायला हवा. आमचे शिवाजी महाराजांशी जरी रक्ताचे नाते असले, तरी त्या रक्ताच्या नात्यापेक्षा त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही वाटचाल करु, असे प्रतिपादन कोल्हापूरचे खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले. 

लाईफ (लाईक-माईंडेड इनिशिएव्ह फॉर एम्पॉवरमेंट) संस्थेतर्फे आयोजित युवा महोत्सवांतर्गत लाईफ स्फूर्ती सन्मान २०१७ पुरस्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी सनबीम एज्युकेशनल इन्स्टिटयूटचे अध्यक्ष सारंग पाटील, सोपान कुंजीर, पोपटराव कटके, संदेश दांगट, लक्ष्मणराव कोंढाळकर, लाईफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओंकार कोंढाळकर, आदित्य जोशी, प्रज्वल कोंढरे उपस्थित होते. 

यंदाचे पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, क्विक हिलचे संस्थापक कैलास काटकर, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, जाधवर इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष शार्दुल जाधवर आणि धनश्री ग्रुपचे संचालक राजेंद्र जानराव यांना प्रदान करण्यात आले. तसेच विशेष युवा सन्मान कर्तव्य फाऊंडेशन जालनाचे श्याम वाढेकर, युवा व्याख्याते सचिन पवार आणि बीडमधील पंचायत समिती सदस्या पूजा मोरे यांना प्रदान करण्यात आला.