ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी-चिंचवडकरांना आजपासून दररोज पाणीपुरवठा, मात्र पाणीकपात कायम

पिंपरी, दि. १३ - पवना धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणीकपातीसाठी आग्रही असणारे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी टीकेच्या भडीमारानंतर अखेर थोडे नरमले आहेत. मंगळवार (दि.१३) पासून शहरवासियांना दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली. तसेच चांगला पाऊस पडेपर्यंत १० टक्के पाणीकपात कायम राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल आदी उपस्थित होते.

पवना धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एक महिन्यापूर्वी म्हणजेच मे पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. पावसाला सुरुवात झाली आहे. आजमितीला धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. परंतु, पावसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी पाणीकपात कामय ठेवून मंगळवापासून दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे, महापौर काळजे यांनी सांगितले.

सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, एक महिना पाणीकपात केली होती. एका महिनाभरामध्ये टक्के पाणी वाचले आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. आजच्या तारखेला २३ टक्के धरणात पाणीसाठा आहे. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये. यासाठी पाणीकपात करणे गरजेचे आहे. त्यामुळे १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्यात येणार आहे. मंगळवारपासून शहरवासियांना दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.