ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी पालिकेतील नगरसेवकांना ड्रेसकोड, अधिका-यांना ब्लेझर

चिंचवड, दि. १४ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व नगरसेवकांना आता ड्रेसकोड मिळणार आहे. तसेच महिला अधिका-यांनादेखील पोशाख दिला जाणार आहे. त्याचबरोबर पालिकेच्या क्लास वन अधिका-यांना ब्लेझर देऊन त्यावर 'नेमप्लेट' असणार आहे

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघातर्फे महापालिकेच्या कर्मचा-यांना गणवेश देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी लागणा-या कापडाची निविदा काढून गणवेश शिवण्याचे काम पुण्यातील मेसर्स महालक्ष्मी ड्रेसेस अॅण्ड टेलरिंग फर्मला पुनर्प्रत्ययी आदेशानुसार देण्यात आले आहे. त्यासाठी कोटी, लाख ९० हजार ६५५ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी महालक्ष्मी ड्रेसेस यांच्याशी करारनामा करुन येणा-या खर्चावर स्थायी समिती सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे

महापालिकेच्या कर्मचा-यांना देण्यात येणा-या गणवेशाप्रमाणेच नगरसेवकांनाही ड्रेसकोड देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिला अधिका-यांनादेखील ड्रेसकोड असणार आहे. त्याचबरोबर महापालिकेतील एक दोन श्रेणीच्या अधिका-यांना ब्लेझर देऊन त्यावर संबंधित अधिका-याची नेमप्लेट आणि महापालिकेचा सिंबॉल असणार आहे. या विषयावरही चर्चा करुन स्थायी समिती सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडून आलेले १२८ आणि स्वीकृत असे १३३ नगरसेवक आहेत. तर, सन २०१५ अखेर अधिकारी आणि कर्मचा-यांची संख्या हजार ४६१ इतकी आहे.