ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिकेचा लेखा विभाग करतोय सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात कामकाज

चिंचवड, दि. १५ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लेखा विभाग चक्क सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात काम करत आहे. महापालिकेच्या ३५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच एखादा विभाग सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कामकाज करत असून याची पालिकेत खिल्ल' उडविली जात आहे.

लेखा विभागाचे लेखाप्रमुख राजेश लांडे हे वादग्रस्त ठरले आहेत. ते राज्य सेवेतील अधिकारी आहेत. त्यांची पिंपरी -चिंचवड महापालिकेत बदली झाल्यावर तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना रुजू करुन घेण्यास विरोध केला होता. लांडे हे राजकीय बळ वापरुन रुजू झाले आहेत. त्यांनी ३१ मार्च २०१७ पूर्वीची ठेकेदारांची बिले अडविली आहेत. लांडे सत्ताधारी भाजपच्या तालावर नाचत असल्याची टीका होत आहे.

महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर लेखा विभाग कार्यरत आहे. लेखा विभागाच्या दारासमोर दररोज तीन ते चार सुरक्षा रक्षक तैनात असतात. नागरिकांना ओळख विचारुनच कार्यालयात सोडले जात आहे. ठेकेदारांना आतमध्ये सोडले जात नाही. पालिकेच्या ३५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच एखादा विभागा सुरक्षा रक्षकाच्या बंदोबस्तात कामकाज करत आहे. सुरक्षारक्षक ठेवल्यामुळे खिल्ली उडविली जात आहे. लेखा विभागातील अधिका-यांना लाच प्रकरणात गोवले जाण्याची भिती वाटत असल्याची, चर्चा आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता ते म्हणाले, लेखा विभागात ठेकेदार जात असतात. तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षारक्षक ठेवले आहेत.