ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री खरेदीत भ्रष्टाचार, विरोधकांचा आरोप

चिंचवड, दि. १६ - पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा नारा देत पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधीश झालेल्या भाजपच्या राजवटीतही आषाढीवारीत सहभागी होणा-या वारक-यांना देण्यात येणा-या भेटवस्तूत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी आज पत्रकार परिषदेत केला.

बाजापेठेत हजार ४०० रुपयांना मिळणारी ताडपत्री भाजपने हजार ४१२ रुपयांना खरेदी करून २२ लाखांच्या निविदेत सुमारे साडेसहा लाखांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. दर पृथ्थकरण आणि निकोप स्पर्धा करताच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्याची चौकशी करावी, बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करून करदात्या जनतेच्या पैशाची लूट करणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या विरोधी पक्षांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारीतील दिंडी प्रमुखांना दरवर्षी भेटवस्तू दिली जाते. गेल्यावर्षी विठ्ठल -रूक्मिणी मूर्ती खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा 'जावई' शोध भाजपने लावला होता. यावरून तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने कोंडीत पकडत आरोपांची राळ उठविली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने चौकशी समिती नेमली होती. परंतु, चौकशी समितीच्या अहवालात कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झाला नसून केवळ अनियमितता झाल्याचे उघड झाले होते. मात्र, हा भावनिक मुद्दा अधिकच गाजल्याने महापालिकेतील सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता द्या, आम्ही पारदर्शक आणि भ्रष्टारामुक्त कारभार करू, असे आवाहन भाजपने शहरवासियांना केले. शहरवासियांनी त्यांच्या आवाहनाला साथ देत भाजपला एकहाती सत्ता दिली. परंतु, तीन महिन्यानंतर भाजपचे खरे रूप बाहेर यायला लागले आहे. आषाढीवारीतील सहभागी होणा-या वारक-यांना देण्यात येणा-या भेटवस्तूत भाजपने भ्रष्टाचार केल्याचा विरोधकांनी पुराव्यासह माध्यमांसमोर उघड केले आहे.

महापालिकेच्या वतीने दिंडी प्रमुखांना यावर्षी भेटवस्तू म्हणून ताडपत्री भेट देण्याचे ठरले. त्यानंतर शंभर टक्के वॉटर प्रुफ, नऊ बाय पंधरा अशी १३५ चौरस फूट साईज, कॅनव्हास केमीकल प्रोसेस, आयएसआय मार्किंग, असे स्पेसिफिकेशन देण्यात आले होते. एकूण ६५० ताडपत्री घेण्यासाठी पहिली निविदा २६ मे रोजी प्रसिद्ध केली. तिची मुदत सात दिवसांची होती. त्यात एकही ठेकेदार आला नाही. त्यानंतर २ जूनला दुस-यांदा निविदा प्रसिद्ध झाली. त्यात एक जणाने निविदा सादर केली.

त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्यावेळी रेखा इंजिनियरिंग, सिद्धी कॉपीयर्स, एमपी इंजिनियरिंग, धर्मे इंटरप्रायजेस, माणिकचंद हाऊस अशा पाच जणांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी अधिकृत वितरकाचे प्रमाणपत्र नाही, असे सांगून तिन ठेकेदारांना अपात्र ठरविण्यात आले. त्यापैकी सिद्धी कॉपीयर्सने हजार ४१२ रुपये आणि