ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विठुरायाच्या नामघोषात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

देहू, दि. १७ - तुतारी, टाळ मृदंगाचा निनाद, विण्याचा झंकार करीत ज्ञानोबा तुकाराम या मंत्राचा गजर करीत, विविध खेळ खेळत पावले आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान लाखो वैष्णव भाविकांच्या साक्षीने शुक्रवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास झाले. पालखी सायंकाळी येथील इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावली.

तुका म्हणे ऐसे अर्त ज्याचे मनी | त्याची चक्रपाणी वाट पाहे || या अभंगाच्या रचनेप्रमाणे खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन पाण्याचे कलश, मुखी हरिनामासह तुकाराम तुकाराम, जयघोष करीत हा सोहळा पंढरीच्या वाटेला लागला.

या प्रसंगी सारा आसमंत टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीची वीणा माऊली तुकोबा निघाले पंढरपुरा, हे बोल गातच सारा देऊळवाडा परिसर दणाणून गेला होता. घामाच्या धारांचा अभिषेक घालत उन्हाची तमा बाळगता आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटण्यासाठी मनोहारी रुप पाहण्यासाठी उपस्थित जनसागर पंढरपूरच्या वाटेवरील पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे रवाना झाला.

आज पालखीचे प्रस्थान असल्याने येतील मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर परिसरातील इंद्रायणी नदी काठ सकाळपासून फुललेला असतानाच हा पालखी सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीत जीवनाचे सार्थक झाले यात धन्यता मानत होता.

प्रथेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे साडेचारला शिळा मंदिरात सुनील मोरे विठ्ठल मोरे यांच्या हस्ते सुरुवात झाली. पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे अभिजित मोरे यांच्या हस्ते, सहा वाजता जालिंदर मोरे, अशोक मोरे यांच्या हस्ते वैकुंठगमन मंदिरात विश्वस्त मंडळाच्या यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सात वाजता तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधीची महापूजा सकाळी दहा Posted On: 17 June 2017