ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे घोटाळ्याचे नियोजन - प्रशांत शितोळे

चिंचवड, दि. १७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीचे पहारेकरी म्हणवून घेणारेच आता गोरगरिबांच्या तिजोरीचे लुटारू झालेले आहेत. विरोधात असताना आरोप केलेल्या कामामध्ये मार्ग काढण्याचे सोडून प्रधानमंत्री आवास योजनेत पैसे कसे खायचे याचे नियोजन करण्यात भाजपचे पदाधिकारी मग्न असल्याची, टीका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेमध्ये केली. तसेच भ्रष्टाचाराचे नियोजन करण्यासाठी भाजपकडे 'भ्रष्टाचार' समिती असल्याचेही, ते म्हणाले.

महापालिकेच्या जून महिन्यात होणा-या सर्वसाधारण सभेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी छोट्या आकाराची घरे बांधण्याचा प्रस्ताव मंजुरी करिता आला आहे. राष्ट्रवादीने जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान प्रकल्पाअंतर्गत १३ हजार २५० घरकुल निर्मितीस दिली. यामधील निम्या घरकुलांचे वाटप देखील झाले आहे. परंतु, भाजपच्या पदाधिका-यांनी विरोधात असताना प्रशासकीय अडचणी शोधून गोरगरिबांना घरे मिळू देण्यासाठी झोपडपट्टीवासियांना त्याच अवस्थेत ठेवण्यासाठी विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे काम केले, असे शितोळे म्हणाले.

केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपचे सरकार असताना प्रधानमंत्री आवास योजना किती चांगली आहे, हे सांगताना त्यांना शहरातील गरिबांचा पुळका येत आहे. त्यांची योजना सर्वांत चांगली, त्यांनी केलेले काम म्हणजे विकास आणि लोकांनी केलेली कामे भ्रष्टाचार हा कसला प्रकार आहे, असे शितोळे म्हणाले. जेएनएनयुआरएम अंतर्गत असणा-या बीएसयुपी अंतर्गत ओटास्कीम पत्राशेड येथे गरिबांना घरे देण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे. भाजपच्या पदाधिका-यांनी शुल्लक तांत्रिक चुका शोधून प्रतिष्ठेचा मुद्दा करीत गरीबांना घरे मिळण्यासाठी काम केले स्वत:ची प्रसिद्धी करून घेतली.

या प्रकल्पांवर न्यायालयातून स्थगिती मिळविली. पण आता सत्तेत असताना तांत्रिक प्रशासकीय अडचणी दूर करून या गरिबांना घरे देण्यासाठी मार्ग शोधण्यात त्यांना रस नाही. उलट नवीन पंतप्रधान आवास योजनेच्या निमित्ताने भ्रष्टाचाराचे नवीन कुरण तयार करण्याची या सत्ताधा-यांना घाई झाली आहे. भ्रष्टाचार करताना अधिका-यांना जुन्या Posted On: 17 June 2017