ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ताडपत्री घोटाळा अधिका-यांना भोवणार की पदाधिका-यांना, पालिकेत चर्चा

चिंचवड, दि. १९ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारीतील वारक-यांना देण्यात येणा-या ताडपत्री खरेदीत तब्बल साडेसहा लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप, विरोधकांनी केला आहे. दरम्यान, वारक-यांसोबत महापौर नितीन काळजे यांनी १८ एप्रिल रोजी भेटवस्तू देण्याबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर ३६ दिवस अधिकारी काय करत होते, तसेच पदाधिका-यांनाही याचा विसर पडला. २६ मे रोजी ताडपत्री खरेदीची पहिली निविदा काढली. यामुळे ताडपत्री घोटाळा नेमका अधिका-यांना भोवणार की पदाधिका-यांना भोवणार याची जोरदार चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारीतील वारक-यांना दरवर्षी भेटवस्तू देण्यात येते. गेल्यावर्षी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देण्यात आली होती. त्यावेळी विरोधात असलेल्या आताच्या सत्ताधा-यांनी मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा 'कांगावा' करत तत्कालीन सताधा-यांवर आरोपांची राळ उठविली होती. सर्वसाधारण सभेत आणि बाहेर आंदोलन केले. तसेच भाजपने हा भावनिक मुद्दा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा केला होता. त्याचा राष्ट्रवादीला निवडणुकीत फटका बसला. त्यानंतर पिंपरी पालिकेत महापालिकेत सत्तांतर झाले आणि भाजपची सत्ता आली. वारक-यांना कोणती भेट वस्तू द्यायाची याबाबत चर्चा करण्यासाठी १८ एप्रिल २०१७ रोजी पालिकेत बैठक घेतली होती. यामध्ये वारक-यांना ताडपत्री देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर ३६ दिवस अधिका-यांनी वेळकाढूपणाची भुमिका घेतली. तसेच पदाधिका-यांनाही ताडपत्री खरेदीचा विसर पडला होता

२६ मे २०१७ रोजी ताडपत्री खरेदीची निविदा ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन काढण्यात आली. त्यामुळे ताडपत्री खरेदीची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली नाही. यामुळे थेट पद्धतीने ताडपत्री खरेदी करण्यात आली. त्यामुळे ताडपत्री घोटाळा प्रकरण अधिका-यांना की पदाधिका-यांना भोवणार याची चर्चा सुरु आहेयावर्षीच्या आषाढी वारीत दिंड्यांना सप्रेम भेट देण्यासाठी या साडेसहाशे ताडपत्री खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. बाजारभावापेक्षा एक हजार रुपये अधिक प्रत्येक ताडपत्रीमागे देण्यात आल्याने साडेसहा