ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एचसीएमटीआर रस्त्यावरील घरे पाडण्यास संघर्ष समितीचा विरोध

चिंचवड, दि. १९ - वाल्हेकरवाडी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यास 'घरे वाचवा संघर्ष समितीने' ठाम विरोध केला आहे. प्राधिकरण आणि पिंपरी पालिकेच्या चुकीचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास कशासाठी? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. यामुळे पालिका, प्राधिकरण आणि नागरिकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५ टक्के जागेचा ताबा असून उर्वरीत जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईला घरे वाचवा संघर्ष समितीने तीव्र विरोध केला आहे.

याबाबत संघर्ष समितीची नुकतीच एक बैठक देखील झाली आहे. या बैठकीला नगरसेवक नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, रघुनाथ वाघ आदी उपस्थित होते

याबाबत बोलताना संघर्ष समितीचे समन्वयक आबा राजपुत आणि मोतीलाल पाटील म्हणाले की, आर्थिक दुर्बल घटकांतील लोकांना घरे देण्यासाठी ग्रामस्थांनी सन १९६० -७० साली प्राधिकरण आणि पालिकेला जागा दिली होती. या जागेवर आरक्षण टाकताना पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण आणि पालिकेने कायद्याने ग्रामसभा बोलवून रहिवाश्यांचे मत जाणून घेणे गरजेचे होते. त्यानंतरच आरक्षण टाकणे गरजेचे होते. पंरतु, चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आले आहे.

पालिका आणि प्राधिकरणाच्या या चुकीमुळे वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर आणि बळवंतनगर येथील ८५० पेक्षा जास्त घरे पाडली जाणार आहेत. घरे पाडण्यास चिंचवड ग्रामस्थ आणि रहिवाशांच्या तीव्र विरोध आहे. तसेच यासाठी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे.

'एचसीएमटीआर' रस्त्यावरील आरक्षण राज्य सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे यामध्ये बदल होऊ शकतात. प्राधिकरण आणि पालिकेने नागरिकांची मते जाणून घ्यावीत. चर्चेतून तोडगा काढावा, असेही ते म्हणाले.