ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी महापालिका करणार दहा हजार झाडांची लागवड

चिंचवड, दि. २० - पिंपरी -चिंचवड महापालिका यंदाच्या पावसाळ्यात सुमारे दहा हजार नवीन झाडांची लागवड करणार आहे. या झाडांची देखभाल आणि संरक्षण राज्य वनविकास महामंडळातर्फे केले जाणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे - चिखली येथील गायरान, -होली येथील वाघेश्वर मंदिर परिसर आणि पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म या ठिकाणी सुमारे दहा हजार नवीन झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे सन २०१५ च्या मान्सुनपासून नागरी भागात हरीत शहर योजना राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही उपाययोजना करण्याबाबत कळविण्यात आले आहे. राज्य वनविकास महामंडळ ही शासन अंगीकृत संस्था आहे. त्यामुळे 'हरित शहर योजना' कार्यान्वित करण्यासाठी वृक्ष लागवड, त्यांचे संरक्षण आणि देखभाल करण्याचे काम या महामंडळाकडून करून घेण्यात येणार आहे. 

वृक्ष लागवडीनंतर या महामंडळाकडून तीन वर्षांच्या कालावधीमध्ये या वृक्षांचे देखभाल व संरक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति रोप ६१० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे राज्य वनविकास महामंडळाला देण्यात येणा-या ६१ लाख रुपये खर्चावर महापालिका स्थायी समिती सभेत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.