ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिका विद्यार्थ्यांचा एक गणवेश १,३३२ रु., एकूण खर्च २ कोटी २१ लाखांचा

चिंचवड, दि. २० - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे शालेय गणवेश देण्यात येणार आहे. एक गणवेश ,३३२ रुपयांचा असून गणवेशासाठी कोटी २१ लाख रुपये खर्चाची तयारी महापालिकेने केली आहे.

महापालिका शिक्षण मंडळांतर्गत १३६ प्राथमिक शाळा, तर माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत १८ माध्यमिक शाळा आहेत. शिक्षण मंडळांतर्गत बालवाडी, प्राथमिक शाळा आणि पहिली ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थी येतात. तर, माध्यमिक शाळांमध्ये आठवी ते दहावीचे विद्यार्थी येतात. या सर्व विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे शालेय गणवेशाचे वाटप करण्यात येते.

सन २०१७-१८ या चालू शैक्षणिक वर्षामध्ये माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे गणवेश देण्यात येणार आहे. महापालिकेच्या अठरा माध्यमिक विद्यालयांमध्ये आठवी ते दहावीच्या वर्गामध्ये ८३०२ विद्यार्थी शिकत आहेत. ही विद्यार्थी संख्या एप्रिल २०१७ नुसार अंदाजित आहे. त्यांना देण्यात येणा-या प्रति विद्यार्थी दोन गणवेशासाठी - निविदा मागविण्यात आली होती.

त्यावर प्राप्त झालेल्या एकूण निविदापैकी वाकड येथील मेसर्स महालक्ष्मी ड्रेसेस ॅन्ड टेलरींग फर्मची निविदा सर्वात कमी दराची होती. या फर्मतर्फे प्रत्येक गणवेशासाठी १३३२ रुपये याप्रमाणे दर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे 'महालक्ष्मी' फर्मशीच करारनामा करण्यात आला आहे. ८३०२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येणार असून यावर कोटी २१ लाख हजार १७४ रुपयांचा खर्च होणार आहे.