ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अधिकाऱ्यांना दक्षिणा, हॉटेलला प्रदक्षिणा तेव्हाच मिळणार सोमरसाचे तीर्थ

चिंचवड, दि. २१ - सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू विक्री करणाऱ्या दुकानांवरील बंदी कायम ठेवतानाच त्यामध्ये हॉटेल-रेस्टॉरंट आणि परमीट रूम-बारवरही बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र अनेक हॉटेलचालकांनी नामी शक्कल लढवीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम चालविले आहे. सरकारी अधिकाऱ्यांना दक्षिणा देऊन तसेच हॉटेलला मोठी प्रदक्षिणा मारायला लावून ग्राहकांना सोमरसाचे तीर्थ खुलेआम उपलब्ध करून देण्यात येत आहे. पैशांच्या जोरावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही गुंडाळून ठेवणाऱ्या या हॉटेलचालकांवर शासन काय कारवाई करते, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरच्या आत दारु विक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक हुशार हॉटेल चालकांनी नामी शक्कल लढवत त्यातूनही पळवाट शोधून काढली आहे. वाकड येथे महामार्गालगत असलेल्या सयाजी हॉटेलने तर अजबच प्रताप केला आहे. शासकीय अधिकाऱ्यांना दक्षिणा देण्याबरोबरच ग्राहकांना हॉटेलला चक्क मोठी 'प्रदक्षिणा' घालयला लावून महामार्गापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेलचे प्रवेशद्वार ५०० मीटर लांब करुन करून दाखविण्याची किमया केली आहे. 'सयाजी' प्रमाणेच शहरातील महामार्गालगतच्या अनेक हॉटेलचालकांनी असेच अंतर वाढविण्याची केले आहे.

मद्यप्राशन करून वाहने चालविल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आत दारु विक्रीस बंदी घातली आहे. तसेच राष्ट्रीय राज्य महामार्गावर मद्याचे चिन्ह किंवा मद्य उपलब्ध असल्याबाबत जाहिरातींवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये महामार्गालगत अनेक हॉटेल आहेत. अनेक हुशार हॉटेल चालकांनी त्यातूनही पळवाट काढली आहे. त्यासाठी विविध नामी शक्कल लढविल्या जात आहेत. महामार्गालगतच्या काही हॉटेल चालकांनी तर हॉटेलच्या आजूबाजूची जागा खरेदी केली अथवा भाड्याने घेतली आहे. त्या जागेत वळणावळणाचा रस्ता बनवून हॉटेलचे प्रवेशद्वार महामार्गापासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्याचे दाखविण्यात येत आहे. त्यामुळे कायदा काहीही केला तरी हॉटेल व्यासायिक त्यातून पळवाट काढत असतात, मात्र या पळवाटेमुळे चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामागील हेतूलाच हरताळ फासण्यापर्यंत या मंडळींची हिंमत वाढल्याचे पहायला मिळत आहे.

देहूरोड -कात्रज बायपास राष्ट्रीय महामार्गावर अलिशान सयाजी हॉटेल आहे. हे अगदी महामार्गालगत आहे. या हॉटेलचे गेट महामार्गापासून जेमतेम ५० मीटर अंतरावर होतेहॉटेल महमार्गापासून ५०० मीटरच्या आत असल्याने नियमाप्रमाणे हॉटेलमध्ये दारु विक्री बंद करावी