ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गंभीर गुन्हे करणा-या आंतरराज्यीय टोळीला तळेगाव पोलिसांकडून अटक

तळेगाव, दि. २३नवी दिल्ली तसेच राज्यभरात जबरी चोरी, खंडणी मागणे, दरोडा, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या सात जणांच्या टोळीला तळेगाव पोलिसांनी आज (गुरुवारी) पहाटे दोनच्या सुमारास अटक केली आहे.

अविनाश अरुण खंडागळे (वय २२), कैलास लक्ष्मण चांदणे (वय २३), संतोष सुंदर घुणे (वय २३), संदीप कचरू भालेराव (वय २७), सचिन रतन कांबळे (वय २०), बाळकृष्ण ज्ञानेश्वर मंडलीक (वय २५), प्रदीप ज्ञानेश्वर मंडलीक (वय २२), सर्व रा. ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर) सर्वांवर संवेदनशील खून, अपहरणासह दरोडा खंडणी, बलात्कार, असे गंभीर गुन्हे दाखल  असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलसिंग हे लोणवळ्याहून पुण्याकडे त्यांच्या कारने कुटुंबासह येत असताना पहाटे दोनच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर झोप येत असल्यामुळे चेहऱ्यावर पाणी मारण्यासाठी थांबले. यावेळी ते आरोपींनी येऊन कोयता चाकूचा धाक दाखवून धमकावून त्यांच्याकडून हजार रुपये रोख सोने, असा सुमारे ५० हजारांचा ऐवज चोरी केला. याबाबत उर्से टोल नाका येथे असलेल्या पोलीस कर्मचा-याला फिर्यादींनी माहिती दिली. त्यांची मुलगी आजारी असल्यामुळे ते दवाखान्यात निघून गेले.

अगदी नाट्यमयरित्या तळेगाव पोलिसांनी अवघ्या तीन तासात सलग पाठलाग करत या सातही आरोपींना अटक केले आहे. फिर्यादींनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे कर्मचारी यांच्यासह खासगी वाहनांनी शोध घ्यायला सुरुवात केली. यावेळी आरोपी पळून गेले होते. मात्र, त्यापैकी एक आरोपी गाडीत बसू शकल्याने तो रस्त्याच्या बाहेर डोंगरात पळून गेला.

पोलिसांनी शोध थांबविल्याचे नाटक करून ते माघारी फिरले. त्यावेळी रचलेल्या सापळ्यानुसार राहिलेल्या आरोपीस घेण्यासाठी त्याचे साथीदार आले. यावेळी आयआरबीच्या क्रेनमध्ये बसून पेट्रोलिंग चालू ठेवली. त्या दरम्यान तो आरोपी रस्त्यावर दिसून आला त्यास ताब्यात घेतला त्याच्या मोबाइलवरून त्याच्या साथीदारांना घेण्यास बोलाविले. दरम्यान, या टोळीचा प्रमुख प्रदीप मंडलिक हा पळून जाताना पुलावरून उडी मारल्याने त्याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. त्यानेही त्याच्या साथीदारांना फोन करून बोलावले. त्यामुळे पोलिसांनी आयआरबीच्या अॅम्ब्युलन्समध्ये पकडलेल्या साथीदारासह पळून गेलेल्या दरोडेखोरांचा शोध घेत असताना एक दरोडेखोर त्यांच्या सेन्ट्रो कारने राहिलेल्या आरोपीस घेण्यासाठी आला. यावेळी त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेत्याच्या सांगण्यावरून उरलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी त्यांच्याच सॅन्ट्रो कारमध्ये बसून त्यांनाही ताब्यात घेतले अवघ्या तासात सातही दरोडेखोरांना गुन्ह्यात वापरलेल्या दोन Posted On: 23 June 2017