ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

माजी नगरसेवकाच्या मुलीनेच दिली गोळीबाराची सुपारी

पिंपरी, दि. २४ - पिंपळे गुरव गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळत आहे. भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी दोन अज्ञातांनी योगेश शेलार या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार केला. हा गोळीबार पुण्यातील एका माजी नगरसेवकाच्या मुलीने घडवून आणल्याचे समोर येत आहे. पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत वडिलांना शेलार यांच्यामुळे पराभव स्वीकारावा लागल्याचा राग मनात धरून हा गोळीबार केल्याचे समजते. दरम्यान संबंधित मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

योगेश शंकर शेलार (वय. ४० रा. सांगवी), असे जखमी झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहेही घटना आज (शनिवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास तुळजाभवानी मंदिराजवळ घडली.

पुणे महापालिकेच्या माजी नगरसेवकाचे जखमीच्या नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध होतेमहापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निडणुकीत शेलार हे त्यांच्या प्रचारासाठी गेले असताना नगरसेवाकाच्या मुलीने शेलार सोबत भांडण केले होते. शेलारच्या नातेवाईक महिलेमुळे वडील बाद झाल्याचा राग मनात धरून मुलीने सुपारी देऊन गोळीबार घडवून आणल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. त्यानुसार सांगवी पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकाच्या मुलीवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

शेलार हे स्विफ्ट गाडीमधून पिंपळे गुरव येथील बस स्टॉपजवळ असलेल्या तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर शेलार यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. काही अज्ञातांनी गोळीबार केला ते पसार झाले. शेलार यांच्या पायाला दोन गोळ्या लागल्या असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी औंध येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिर, मुख्य बस थांबा राजमाता जिजाऊ उद्यानाचा हा परिसर अत्यंत वर्दळीचा असतो. त्या ठिकाणी भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.