ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे पतीची पत्नी, मुलीचा खून करून आत्महत्या

लोणावळा, दि. २६ - पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे पतीने पत्नी आणि मुलीची दोरीने गळा आवळून हत्या करत गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच ११ वर्षाच्या मुलाचाही गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुदैवाने तो बचावला आहे. ही धक्कादायक घटना आज (रविवारी) लोणावळ्याजवळील भांगरवाडी हनुमान टेकडी लगत असलेल्या क्रांतीनगर वसाहतीमध्ये घडली.

बबन जयवंत धिंदळे (वय ३८ वर्ष) त्यांची पत्नी दीपाली (वय ३० वर्ष) आणि मुलगी दिप्ती ( वर्ष) अशी या मृतांची नावे आहेत. बबनने त्याचा मुलगा रोहित (वय ११ वर्ष) याचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो गळा आवळल्यानंतर बेशुद्ध पडल्याने बचावला. त्याच्यावर लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नी दीपाली हिचे प्रेमप्रकरण उघड झाल्याने चिडून जाऊन बबन याने कुटुंबातील सर्वांना संपवून आत्महत्या केली असल्याचे वास्तव समोर आले आहे. या घटनेची माहिती समजताच क्रांतीनगर परिसरात शोककळा पसरली.

ओळकाईवाडीतील क्रांतीनगर येथे बबन धिंदळे आणि त्याचे कुटुंबीय राहत होते. बबन हा पेंटिंगचा व्यवसाय करत होता. काही दिवसांपूर्वी त्याला पत्नीचे बाहेरच्या एका व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याचे समजल्याने रविवारी सकाळी पावणेआठ वाजण्यापूर्वी पत्नी दीपाली आणि दोन्ही मुलांचा दोरीने गळा आवळत खून केला. यावेळी मुलगा रोहित हा बेशुद्ध पडला. तिघेही मृत्यू पडल्याचे समजून बबनने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, यात दीपाली आणि दिप्तीचा मृत्यू झाला रोहित हा बचावला आहे.

घटनेची माहिती समजताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी घटनास्थळाला भेट देत माहिती घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास लोणावळा ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील या करत आहेत.