ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पोलीस कर्मचा-याला मारहाण करणा-या नगरसेविकेच्या पतीला अटक

निगडी, दि. २६ - दारूच्या नशेत पोलीस कर्मचा-याला मारहाण करणा-या भाजप नगसेविकेच्या पतीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू घोलप (रा. ओटा स्किम, निगडी ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून घोलप याच्या पत्नी प्रभाग क्रं. १३ मधील भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोलप हा काल रात्री निगडी पोलीस ठाण्यात माझ्या प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी घेऊन आला होता. मात्र, मुळ तक्रारदार सोबत नसल्याने पोलिसांनी पहिले तक्रारदाराला आणा मग तक्रार घेतो असे सांगितले. यावेळी घोलप याने गोंधळ सुरू केला. तसेच पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. दरम्यान, पोलिसांनी घोलप याला अटक केली असून सरकरी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.