ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुख्य लेखापालांनी लाच मागितल्याची पंतप्रधान संकेतस्थळावर तक्रार

चिंचवड, दि. २७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे हे बिलांचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात 3 टक्के रक्कम मागत असल्याच्या तक्रारी ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर केल्या आहेत. या तक्रारींची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून खुलासा मागितला आहे. यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर, महापालिकेतील कोणताही अधिकरी नागरिकांकडून लाचेची मागणी करत असेल तर त्याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रारी कराव्यात, असा पवित्र आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. 
राजेश लांडे तीन वर्षापूर्वी नाशिक महापालिकेतून बदली होऊन पिंपरी पालिकेत आले आहेत. पालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीत देण्यात येणारे सानुग्रह अनुदान लांडे यांनी अडविले होते. त्यावरुन कर्मचारी महासंघ आणि मुख्य लेखापाल लांडे यांच्यामध्ये 'झगडा' झाला होता. तत्कालीन महापौर शकुंतला धराडे यांच्यासोबतही त्यांची सानुग्रह अनुदानावरुन वादावादी झाली होती. अखेरीस तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यामध्ये समेट घडवून आणून सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांना दिली. 
महापालिका सभेने राजेश लांडे यांच्या बदलीचा ठराव देखील केला होता, परंतु त्यांनी नगरविकास खात्याचा दबाव आणून आपली नियुक्ती कायम ठेवली. एवढेच नव्हे तर आपले दालन प्रशस्त केले. कार्यालयाची रचना बदलली. 
राजेश लांडे यांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली ३१ मार्चची मूदत संपल्याचे कारण पुढे करत १६० कोटी रुपयांची ठेकेदारांची बिले अडविली आहेत. राजेश लांडे हे भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत. 
लांडे यांनी लेखा विभागाच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा रक्षक तैनात केले होते. पालिकेच्या ३५ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखदा विभाग सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कामकाज करत होता. त्यामुळे याची पालिकेत खिल्ली उडविली