ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पालिकेत ३ टक्यांच्या तक्रारींची चर्चा, अधिकारी, पदाधिका-यांमध्ये घबराट

पिंपरी, दि. २९ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे हे बिलांचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात तीन टक्के रक्कम मागत असल्याच्या तक्रारीची थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन आयुक्तांकडे खुलासा मागितला आहे. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर अधिकारी, पदाधिका-यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून याची पालिकेत जोरदार चर्चा सुरू आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे दोघेही आज पालिकेत उपस्थित नव्हते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे हे बिलांचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात तीन टक्के रक्कम मागत आहे, अशा तक्रारी ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर केल्या आहेत. या तक्रारींची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून खुलासा मागितला आहे. या गंभीर प्रकाराची माध्यमांनी चांगलीच दखल घेतली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या प्रत्येक अधिका-याच्या कार्यालयामध्ये तीन टक्क्यांचीच चर्चा दिवसभर सुरू होती. एखाद्या तक्रारीची थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतल्याने पदाधिकारी, अधिका-यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यस्तरावरील नेत्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भाजपच्या एका गटात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मुख्य लेखापाल राजेश लांडे देखील बुधवारी पालिकेत आले नाहीत. पिंपरी महापालिकेच्या आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत देखील याची जोरदार चर्चा झाली.

स्थायीच्या सदस्यांनी ठेकेदांराची तक्रार पाहण्यास मागितली. परंतु, तक्रार जाहीर Posted On: 29 June 2017