ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राजेंद्र जगताप यांची नियुक्ती

पिंपरी, दि.  - पुणे महापालिकेच्या माजी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

जगताप यांनी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कारभार जवळपास चार वर्षे कारभार सांभाळला होता. जगताप यांचे केडर खरे तर संरक्षण विभागांतर्गत येणा-या कॅन्टोन्मेंट बोर्ड सेवेचे आहे. या सेवेतील अधिकारी महापालिकात सहसा प्रतिनियुक्तीवर येत नाहीत. जगताप हे त्याला अपवाद ठरले. तत्कालीन आघाडी सरकारने त्यांची ही नियुक्ती केली होती. आता पुन्हा एकदा जगताप यांची स्मार्ट सिटीच्या महत्त्वाच्या प्रकल्पावर वर्णी लागली आहे.

पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे या आधी ही जबाबदारी होती. मात्र, तेथून त्यांना हटविण्यात आले होते. त्यांच्याऐवजी सैनी यांच्याकडे या पदाचा कार्यभार होता. सैनी यांनी पदभार घेण्यापूर्वीच त्यांची बदली झाली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे स्मार्ट सिटीची जबाबदारी आली. त्यांना दूर करून जगताप यांच्याकडे या पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. केंद्र सरकार आणि पालिका यांच्यात समन्वय ठेवणे, या प्रकल्पांतर्गत येणा-या कामांचे आखणी, नियोजन याची सूत्रे जगताप यांच्याकडे येतील.