ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रिंगरोड बाधितांचा प्राधिकारण कार्यालयावर दिंडी मोर्चा

निगडी, दि. ३० - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) यांच्या वतीने गेल्या दिवसात रिंगरोडच्या आराखड्यात येणाऱ्या घरांवर दुकानांवर बांधकाम पाडण्याच्या नोटीस लावल्या जात आहेत. त्या विरोधात आज (शुक्रवारी) नागरिक व्यापाऱ्यांनी घर बचाओ संघर्ष समितीच्या वतीने निगडीतील प्राधिकरण कार्यालयावर दिंडी मोर्चा नेला आहे.

यामध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक व्यापारी सहभागी झाले. त्यांनी हातात पताका-टाळ-तूळस अशी विठ्ठलाची दिंडीच कार्यालयाच्या गेटवर आणली. प्राधिकरण कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकांनी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने सकाळी साडेनऊ पासून पडत्या पावसात लोक रस्त्यावरच विठूनामाचा गजर करत बसले. प्राधिकरण कार्यालयाकडून लावण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या नोटीस मागे घ्याव्यात, आमच्या हक्काची घरे दुकाने आम्ही पाडू देणार नाही, अशी भूमिका घर बचाओ संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुमार पाटील यांनी मांडली.

दिंडी मोर्चा कार्यालयाच्या जवळ येताच कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असल्याने आता प्रशासनानेच खाली येऊन आमचे निवेदन स्वीकारावे. आम्ही कार्यालयात जाणार नाही, असे रेखा भोळे यांनी सांगितले. बराच वेळ गेल्यानंतर पीसीएनटीडीएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वारावर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा केला नसून आंदोलनकर्ते अजूनही न्यायाच्याच प्रतीक्षेत आहेत.