ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

घरात मांजर शिरले म्हणून म्हाळुंगेत महिलेचा खून, चौघांना अटक

म्हाळुंगे, दि. ३ - घरात शिरलेले मांजर फेकून दिल्याच्या कारणावरून महिलेला बेदम मारहाण करून तिचा खून करण्यात आला. हे घटना म्हाळुंगे येथील शिवाजी पाडळे यांच्या चाळीत काल, रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली आहे.

शेजारी असलेल्या महिलेच्या घरात आरोपीचे मांजर शिरले होते, त्या महिलेने ते घरातून फेकून दिले, याच कारणावरून महिलेला, काठ्यांनी, पीव्हीसी पाईपने मारहाण करण्यात आली. यामध्ये प्रभा मोहन रंगपीसे (वय ४० रा. शिवाजी पाडळे चाळ, खोली नं २४ ही महिला गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. महिला आणि आरोपी यांच्यात अगोदरचे वाद होते.

या प्रकरणी पोलिसांनी अमोल संदीपान बालगुडे , गणेश उर्फ भैया श्रीमंत पाटील, आकाश राजेश मोंडे, राजू नंदकिशोर साळवे ( सर्वजण  रा. म्हाळुंगे ) या चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी अजय मोहन रंगपीसे ( वय- २७ ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी अजय रंगपीसे याची बहीण सारिका दादू खलसे हिचे मांजर तिच्या शेजारी राहणाऱ्या राजू नंदकिशोर साळवे याच्या घरात शिरले होते. ते मांजर त्याने घराच्या बाहेर फेकून दिल्याच्या कारणावरून दादू खालसे हे जाब विचारण्यासाठी गेले. त्यावरून आरोपीनी लाथाबुक्क्यांनी, पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मध्ये फिर्यादीची आई प्रभा मोहन रंगपीसे या मध्ये पडल्या. तिच्या डोक्यात व पाठीवर गणेश उर्फ भैया पाटील याने बांबूने मारहाण केली. त्यामध्ये प्रभा रंगपीसे या मृत झाल्या. मृत महिला आणि आरोपी यांच्यात अगोदरचे वाद होते अशी माहिती पुढे आली  आहे.

पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक  न्यामणे करीत आहेत.