ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

देहुरोड येथे टोळक्यांचा धुडगुस, वाहनांच्या काचा फोडल्या

देहुरोड, दि. ३ - देहुरोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र फिरणाऱ्या टोळक्यांच्या भीतीने स्थानिक नागरिक धास्तावले आहेत परिसरात गटातटांच्या भांडणामुळे गुंडाच्या टोळया निर्माण झाल्या आहेत. शस्त्राचा धाक दाखवून लूबाडणे, वाहनांच्या काचा फोडणे, व्यापायऱ्यांना हप्ता देण्यासाठी दमबाजी करणे, मारहाण करणे असे प्रकार आता शहरात घडू लागले आहेत.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ८ ते १० जंणाच्या सशस्त्र टोळक्याने शहरात दहशत माजवत मुकाई चौक किवळे परिसरात अनेक दुकानाचीं तोडफोड केली. परिसरात उभ्या असलेल्या १० ते १२ चारचाकी वाहनाची तोडफोड केली या घटनेत नितिन गोसावी या २१ वर्षोंय तरूणाला टोळक्याने बेदम मारहाण केली.

गंभीर जखमी झालेल्या नितीन गोसावी याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रात्रभर चाललेल्या या टोळक्याच्या उच्छादाने देहुरोड पोलिसांची तारांबळ उडाली घटनास्यळी पोहचून सुद्धा एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुंडावर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.