ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अनधिकृत बांधकामे नियमित होणार तर शास्तीकर कशासाठी - विलास लांडे

चिंचवड, दि. ४ - शास्तीकरात पाचशे, हजार स्क्वेअर फुट अशी वर्गवारी केली जात आहे. केवळ श्रेयवाद आणि प्रसिद्धीसाठी सत्ताधा-यांचा खटाटोप सुरु आहे. अनधिकृत बांधकामे नियमित होणार. त्यामुळे शास्तीकर वसूल करु नये, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली. शास्ती वगळून मिळकत कर भरण्याची सुविधा कायम ठेवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पिंपरीत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे -पाटील उपस्थित होते.

संजोग वाघेरे म्हणाले, शास्तीचे भूत नागरिकांच्या डोक्यावरुन उतरलेले नाही. निवडणुकीत मतदारांना गाजर दाखविण्यासाठी शास्तीकर माफीचा निर्णय झाल्याचा आदेश दाखविला. वास्तिवक हा आदेश फसवा आहे. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना लावण्यात येणा-या शास्तीकराबाबत माफीची घोषणा फसवी आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात बांधकाम दंडातून पालिकेला १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या उत्पनात कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २०१५-१६ मध्ये पहिल्या तिमाहित ३ कोटी १२ लाख रुपयांचे आणि २०१६-१७ मध्ये कोटी ८२ लाख रुपयांचे उत्पन्न अवैध बांधकामातून पालिकेला मिळाले होते. यंदा त्यामध्ये त्यामध्ये वाढ होऊन १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

विठ्ठल - रुक्मिणी मूर्ती घोटाळा, गॅस शवदाहिनी घोटाळयाचे झाले काय?
संजोग वाघेरे - पाटील म्हणाले, भाजपने गोबेल्स नितीचा अवलंब करत पिंपरी महापालिकेची सत्ता काबीज केली. विठ्ठल - रुक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाला, गॅस शवदाहिनीत घोटाळा झाला असे खोटेनाटे आरोप केले. आम्ही सत्तेमध्ये असताना तातडीने चौकशी समित्या नेमल्या. त्यांचे अहवालही आले. मात्र, त्यातून काय निष्पन्न झाले ? आमच्यावर बिनबुडाचे आरोप करताना पुढेपुढे असणारी मंडळी सत्तेच्या खुर्च्यांवर बसल्यावर गपगार झाली आहेत.

आता वारक-यांना देण्यात येणा-या ताडपत्रीत घोटाळा झाल्याचे म्हटले तरी पुरावे द्या मग कारवाई करतो, असे भाजप पदाधिकारी सांगतात. गॅस शवदाहिनीत घोटाळा झाला म्हणणा-यांना अजूनही दोषी अधिकारी सापडत नाहीत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.