ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पालिकेतील पराभवानंतर पहिल्यांदाच अजितदादा येणार

चिंचवड, दि. ४ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचा पराभव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. तेव्हापासून ते आजपर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये फिरकले देखील नाहीत. पालिकेतील सत्ता गेल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी प्रथमच संघटना बांधण्यासाठी अजितदादा शहरात येणार आहेत. त्यामुळे पवार कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पक्ष संघटना बांधणीसाठी अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्यभर दौरा करत आहेत. सिंधुदुर्गपासून ३० जूनला त्यांच्या दौ-याला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर असा त्यांचा दौरा सुरु आहे.

जुलै रोजी पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याची आढावा बैठक होणार आहे. चिंचवड, येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात ६ जुलै रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे-पाटील, महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील उपस्थित राहणार आहेत, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

गेल्या पंधरा वर्षापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. परंतु, फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पिंपरी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभव सहन करावा लागला. हा पराभव राष्ट्रवादीच्या आणि अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.

महापालिकेची निवडणूक होऊन महिने होत झाले. परंतु, पवार एकदाही पिंपरी-चिंचवड शहरात आले नव्हते. पिंपरी-चिंचवडमध्ये तर पक्षाला कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपद, युवक अध्यक्षपद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे.