ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी पालिका करणार टॉयलेट लोकेटर अॅप विकसित

चिंचवड, दि. ६ - पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार स्वच्छतागृह शौचालयांची एकत्रित माहितीदेणारेटॉयलेट लोकेटरहे ॅप विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. अशा प्रकारचे अॅप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका एकमेव आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील विविध शहरांमध्ये सार्वजनिक सामुदायिक शौचालये दर्शवणारेटॉयलेट लोकेटरॅप विकसित करून ते उपयोगात आणण्यात येत आहे. पेट्रोल पंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्थानके, बसस्थानके आदी ठिकाणी असणा-या शौचालयांची स्वच्छतागृहांची एकत्रित माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात येते. पिंपरी पालिकेनेही त्याचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने आवश्यक पावले उचलण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे शौचालयांची संख्या अडीच ते तीन हजारांपर्यंत असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. ही माहितीगुगल मॅपवर टाकण्यात येणार आहे. त्याअगोदर महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेला (क्यूसीआय) हे सर्वेक्षणाचे काम देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

याबाबत बोलताना सह आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही माहितीगुगल मॅपवर टाकण्यात येणार आहे. याचा बाहेरुन आलेल्या नागरिकांना फायदा होणार आहे. जवळच्या परिसरात कुठे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. ते लगेच एका किल्कवर कळणार आहे. देशातील दिल्ली, गुरगाव, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, इंदूर, भोपाळ या शहरांमध्ये हा प्रयोग राबवण्यात आला आहे. अशा प्रकारचे अॅप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका आहे.