ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवाशाला मारहाणकरुन लुटले

देहूरोड, दि. ८ - खाजगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवास्याला लुटून मारहाण करण्यात आल्याची घटना मध्यरात्री पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर घडली. रात्री दीडच्या सुमारास देहूरोडच्या हद्दीत हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाकड येथून प्रवासी एका खाजगी वाहनात बसला मात्र पुढे जाऊन त्या वाहनातील व्यक्तींनी त्याच्याकडून पैसे, मोबाईल काढून घेत मारहाण केली आणि द्रुतगती मार्गावर सोडून दिले. तो प्रवासी जखमी अवस्थेत ४-५ किलोमीटर पायी चालत किवळे पर्यंत आला. तिथून त्याला काही नागरिकांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती देहूरोड पोलीस स्टेशनला देऊन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ती गाडी मुंबईच्या दिशेने पसार झाली.