ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हरित क्षेत्र विकास प्रकल्पासाठी पिंपरी महापालिकेचा समावेश

चिंचवड, दि. १० - अमृत अभियाना अंतर्गत हरित क्षेत्रांची निर्मिती करण्याच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरांच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. दीड कोटीच्या या प्रकल्पासाठी  महापालिकेला केंद्र सरकारकडून ५० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. मात्र, वृक्षारोपण केल्यानंतर त्यापैकी ८० टक्के झाडे जगविण्याची दक्षता महापालिकेला घ्यावी लागणार आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानाअंतर्गत सन २०१५-१६  सन २०१६-१७ च्या वार्षिक कृती आराखड्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या अभियानाअंतर्गत शहरांमध्ये हरित क्षेत्रांची निर्मिती करण्याच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरांच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल पिंपरी महापालिकेमार्फत तयार करण्यात आला होताया प्रकल्पास महापालिका शहर अभियंता यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने राज्यस्तरीय तांत्रिक समितीस हरित क्षेत्र विकास प्रकल्पांच्या डीपीआरला मान्यता देण्याबाबत अधिकार दिले आहेत. त्यानुसार, या प्रकल्प अहवालास अमृत अभियानाअंतर्गत स्थापन केलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. राज्यस्तरीय तांत्रिक समितीने केलेली शिफारस आणि राज्य सरकारच्या मान्यतेच्या अनुषंगाने अमृत अभियानाच्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या राज्य वार्षिक कृती आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे.

मंजुर डिपीआरनुसार या प्रकल्पाची किंमत दीड कोटी रूपये आहे. केंद्र सरकारमार्फत प्रकल्प किमतीच्या ५० टक्के म्हणजेच ७५ लाख रूपये अनुदान महापालिकेला मिळणार आहे. केंद्र सरकारचा हा निधी महापालिकेला तीन टप्प्यात वितरीत केला जाणार आहे. पहिल्यांदा २० टक्के आणि त्यानंतर ४०-४०  टक्के रक्कम देण्यात येणार आहे. तर, राज्य सरकार आणि पिंपरी महापालिका यांचा हिस्सा २५ टक्के असणार आहे. त्यानुसार, राज्य सरकारकडून ३७ लाख ५० हजार रूपये आणि महापालिकेमार्फत ३७  लाख ५० हजार रूपय