ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ब्रेनडेड मुलाच्या अवयव दानातून तिघांना दिले जीवनदान

चिंचवड, दि. ११ - काळ कधी कसा घाला घालतो हे सांगणे कठीण असते. अशाच एका दुर्देवी अपघातात जबर जखमी झाल्यामुळे १९ वर्षाचा तरुणाचे ब्रेनडेड झाले. हा आघात पचवत त्याच्या अवयवचे दान करत कुटुंबीयांनी आपल्या मुलाला पर्यायाने त्याच्या माध्यमातून इतर तिघांना जीवनदान देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कुटुंबीयांनी घेतला ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

मोटार सायकलवरून आकाश कदमला (नाव बदलले आहे) २६ मे रोजी जात असताना त्याचा अपघात झाला. यावेळी त्याने हेल्मेट घातलेले नसल्याने त्याला जबरदस्त दुखापत झालेली होती. त्याला तातडीने आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्याठिकाणी उपचारही सुरू करण्यात आले. परंतु आकाशला झालेली दुखापत इतकी गंभीर स्वरूपाची होती की दुसऱ्या दिवशी त्याला ब्रेनडेड म्हणून घोषित करावे लागले. आकाशला एक धाकटी बहीण असून ती अंध आहे. आकाश हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्याच्या आई वडिलांनी त्याच्या अवयवदानाचा सुजाण निर्णय घेतला.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने सुस्थितीत असलेले अवयव काढण्याच्या प्रक्रिया तातडीने योग्यप्रकारे पार पाडल्या. आकाशची एक किडनी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील एका रुग्णाला दान केली गेली त्याचठिकाणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तातडीने करण्यात आले. त्याचे यकृत रुबी हॉलमधील एका रुग्णाला दान करण्यात आले. दुसरी किडनी तातडीने नाशिकच्या एका रुग्णासाठी पाठवण्यात आली. हे सर्व रुग्ण यकृत किडनीच्या दुर्धर रोगांशी लढत होते अवयवदानामुळे त्यांचे जीव वाचले आहेत.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सीईओ श्रीमती रेखा दुबे यांनी सांगितले की, जानेवारी २०१६ पासून आमच्या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ कुशल सल्लागारांच्या प्रयत्नांना यश येऊन वेळा अवयवदान झाले. यामुळे चार यकृत, आठ किडनी एक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे तसेच त्यासंबंधीच्या शस्त्रक्रिया करण्याचे कार्य आमचे हॉस्पिटल भविष्यातही सुरू Posted On: 11 July 2017