ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रिंगरोडची कारवाई थांबवावी, खासदार बारणेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

चिंचवड, दि. १३ - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणच्या आराखड्यानुसार तयार होणा-या रिंगरोडमध्ये शहरातील पिंपळेगुरव, थेरगाव, कासारवाडी, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रावेत गुरुद्वारा या परिसरातील घरे जाणार आहेत. या घरांमध्ये नागरिकांच्या भावना गुंतलेल्या आहेत. त्या भावनांचा नागरिकांचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई थांबवावी, अशी विनंती  खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली. यावेळी माजी शिक्षण मंडळ सदस्य गजानन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब इथापे आदी उपस्थित होते.

यावेळी बारणे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर केले. बारणे म्हणाले की, रिंगरोड होणार आहे. त्या पट्ट्यात अनेक गोर गरिबांचीही घरे आहेत. आयुष्यभराची कमाई एकत्र करून त्यांनी ही घरे उभारली आहेत. तर काही घरे ही प्राधिकरणाच्या निर्मितीच्याही आधी उभारली गेली आहेत. एवढेच नव्हे तर महापालिका प्रशासनाने त्या घरांना सर्व मुलभूत सोयी सुविधा पुरवल्या आहेत. जर विकास आराखड्यानुसार तेथे रिंगरोड होणार होता तर तशी खबरदारी प्रशासनाने नागरिकांना पूर्वीच द्यायला हवी होती. प्रशासनाच्या चुकीच्या भूमिकेमुळे आज नागरिकांच्या घरावर हातोडा येत आहे.

त्या घरांशी नागरिकांच्या भावना जुडल्या आहेत. घरे वाचविण्यासाठी नागरिक प्रसंगी मरायला मारायला तयार आहेत. नागरिकांनी रोषापोटी सत्ताधा-यांनाही त्यांच्या आंदोलनातून काढता पाय घेणे भाग पाडले. नागरिकांचा उद्रेक पाहता काही अनुचित घडण्या आगोदर मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक सखोल माहिती घ्यावी या प्रश्नी योग्य ती पावले उचलावीत, अशी विनंतीही बारणे यांनी यावेळी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी बारणे यांच्याशी चर्चा करताना म्हटले की, संबंधित आराखड्याची संपूर्ण माहिती घेतली जाईल. तेथील अधिका-यांशीही चर्चा केली जाईल. नागरिकांवर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल संबंधित अधिका-यांशी चर्चा करून याला पर्यायी मार्गही काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी खासदार बारणे यांना दिले.

या रिंगरोडमध्ये पिंपळे गुरव-पिंपळे सौदागर-कोकणे चौक- काळेवाडी फाटा- अशोक सोसायटी- Posted On: 13 July 2017