ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कंत्राटी कामगारांचा पीएफ न भरणा-या संस्थेच्या अध्यक्षावर गुन्हा

चिंचवड, दि. १५ - कंत्राटी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम त्यांच्या खात्यात भरणा-या देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष सचिन पंढरीनाथ काळे (वय ४२) आणि संस्थेचे प्रतिनिधी अशोक थोरात (दोघे, रा. चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीक्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या “इ” क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रस्ते आणि गटर साफसफाईचे काम खासगी ठेकेदारांकडून करून घेण्यासाठी २०१५ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये पात्र ठरलेल्या देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला हे काम मिळाले. या ठेकेदार संस्थेने या कामासाठी १२ कंत्राटी कामगार पुरवावेत, असे आदेश महापालिकेने दिले. त्याबाबतचा करारनामा संस्थेचे अध्यक्ष सचिन पंढरीनाथ काळे यांच्यासोबत महापालिकेने केला आहे.

या ठेकेदार संस्थेचे प्रतिनिधी म्हणून अशोक थोरात हे कामकाज पाहत आहेत. महापालिकेने केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम ठेकेदार संस्थेला अदा केली आहे. महापालिकेने दिलेली रक्कम आणि कामगारांची नियमानुसार ठेकेदाराने भरावयाची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे संस्थेने जमा करणे कायद्याने बंधनकारक आहे.परंतु, काळे व थोरात यांनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे पाच लाख २९ हजार ६५८ रुपये त्यांच्या खात्यात न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन अपहार केला, असे फिर्यादीत नमूद केले.

गुन्हा दाखल झालेल्या दोघांचा शोध सुरु आहे. त्यांना शोधण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे, असे भोसरी ठाण्याचे फौजदार तपासी अधिकारी के.के. लांडगे यांनी सांगितले.