ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

भुशी धरणाच्या पायर्या पर्यटकांसाठी खुल्या

लोणावळा, दि. १७ - भुशी धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसाने शनिवारी धरणाच्या पायर्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने धरणाच्या पायर्यांवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. आज मात्र पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने पुन्हा धरणाच्या पायर्या पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्याने पर्यटकांनी जल्लोष केला.

मागील चार दिवसांपासून लोणावळ्यात पावसाचा जोर वाढल्याने आज रविवारच्या सुट्टी वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लोणावळा शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने राष्ट्रीय महामार्गासह भुशी धरणाकडे जाणार्या मार्गावर आज सकाळ पासूनच मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. द्रुतगती मार्गावर देखिल अंडा पॉईंट ते अमृतांजन पूल दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पुण्याकडे येणार्या लेनवर संथ गतीने वाहतूक सुरू आहे.