ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिक्षण समितीवर उच्चशिक्षित नगरसेवकांना संधी द्यावी - सचिन चिखले

चिंचवड, दि. १७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेत नव्याने होणा-या शिक्षण समितीवर सर्वपक्षीय उच्चशिक्षित पदवीधर नगरसेवकांना संधी द्यावी अशी मागणी, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी पालिकेकडे केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्य सरकारच्या आदेशानुसार शिक्षण मंडळ बरखास्त झाले आहे. त्यामुळे नव्याने शिक्षण समितीची स्थापना करावी लागणार आहे. या समितीवर सर्वपक्षीय उच्चशिक्षित पदवीधर नगरसेवकांना घेण्यात यावे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनेक शाळांची दुरावस्था आहे. दिवसें-दिवस शाळेचा दर्जा घसरत आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेवर मिळत नाही. मराठी शाळा बंद होत आहेत. या गोष्टींचा दर्जा वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांचा मराठी शाळेकडील कल, शाळा डिजिटल, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण सर्व सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण समितीमध्ये ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, असे सर्वपक्षीय उच्चशिक्षित पदवीधर नगरसेवकांनाच संधी द्यावी, असे चिखले यांनी निवेदनात म्हटले आहे.