ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अपघातात जखमी म्हशीला मिळाले जीवदान

लोणावळा, दि. १९ - अपघातात जखमी होऊन रस्त्याच्या कडेला मदतीची वाट पाहणाऱ्या एका म्हशीची लोणावळ्याच्या शिवदुर्ग मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली. तिला पुढील उपचारासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज गोशाळेकडे रवाना केले. मावळातील डोंगरदऱ्यामध्ये अडकलेल्या मुक्या प्राण्यांना जीवदान देण्याचे काम शिवदुर्ग मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या आपुलकीने करतात.

शिवदुर्ग मित्रमंडळाचे सदस्य कैलास दाभने यांचा काल सकाळी फोनवरून एका अपघाताची बातमी कळाली. सहारा रोडवर शिवलिंग पॉइंटच्या पुढे सहारा सिटीकडे कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. यात कोणालाही दुखापत झाली नाही मात्र एका म्हशीला दुखापत झाल्याचे कळाले.

म्हशीला वाचवण्याचा प्रयत्नात ती बस उलटली. बस मधील सर्व प्रवासी सुखरुप होते. पण बसचा धक्का लागल्यामुळे म्हशीला पाठीमागे मुकामार बसून तिचा पाय मोडला होता. त्यामुळे ती जागेवरून उठू शकत नव्हती. बिचारी एकाच ठिकाणी भर पावसात बसून मदतीची वाट पाहत होती.

कैलास दाभने त्वरित ही बातमी जगद्गुरू संत तुकाराम महाराज गोशाळेचे रुपेश गराडे यांना फोनवर दिली. लगेचच रुपेश गराडे, भास्कर सावळे,.तुकाराम गराडे अशी गोशाळेची टीम मित्रमंडळाचे कार्यकर्ते सुनील गायकवाड, राजेंद्र कडु ,आनंद गावडे, दिनेश पवार, समीर जोशी, रोहित वर्तक यांनी घटनास्थळी जाऊन म्हशीला मोठ्या प्रयत्नाने व्यवस्थित गाडीत चढवून, प्रथमोपचार करुन गो शाळेकडे रवाना केले. या पूर्वीही शिवदुर्गने विशाळगडावर अडकलेल्या गाईचा प्राण वाचवला होता. त्यांच्या या कामामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.