ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अनधिकृत फलकांवर महापालिका कायदेशीर कारवाई करणार

चिंचवड, दि. १ - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत फलकांवर पालिका कायदेशीर कारवाई करणार आहे. अनाधिकृतरित्या विनापरवाना फलक लावल्यास संबधित जाहिरातदार जागा मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे, पालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच परवानगी घेऊन फलक लावण्याचे आवाहनही,पालिकेने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचे प्रमाण वाढले आहे. जाहिरातबाजीचे परवाने देण्याच्या माध्यमातून महापालिकेला मिळणा-या उत्पन्नाबाबत स्थायी समितीत जोरदार चर्चा झाली. जाहिरात फलकाच्या माध्यमांतून पालिकेला वर्षाकाठी केवळ आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २४४ २४५ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका जाहिरात नियमावली २००३ चे नियमानुसार आकाश चिन्ह (फलक) उभा करण्यापूर्वी पालिकेच्या परवनगीची आवश्यकता असते. त्यानुसार पालिकेच्या कार्यक्षेत्रमध्ये जाहिरात फलक /होर्डींग/किऑक्स इत्यादी लावणेचा असेल तर कागदपत्रे जोडुन परिपूर्ण भरलेला अर्ज नागरी सुविधा केंद्रामार्फत करणे आवश्यक आहे.

अनधिकृत फलक असल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियम २४४ २४५ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका जाहिरात नियमावली २००३ नुसार नियमाधिन कारवाई करणेत येईल. सबंधितांचे फलक अनधिकृत समजुन काढून स्ट्रक्चर जप्त करण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ नुसार संबधित जाहिरातदार जागा मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.

फलकाच्या परवानगीसाठी लागणारे कागदपत्रे:- विहित नमुन्या मधील अर्ज, स्थळ दर्शक नकाशा असावा त्यांच्या तीन प्रती, जागा मालकाचे ना हरकत प्रमाण पत्र १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरईज्ड असावे, इमारत/जागेचे मालकी हक्का बाबत पुरावा, संरचना अभियंता यांचेकडील स्ट्रक्चर स्टॅबिलीटी प्रमाण पत्र, वृक्ष संवर्धन विभागाकडील ना हरकत प्रमाण पत्र, १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जाहिरातदारचे नोटरईज्ड हमी पत्र आणि जाहिरात फलक इमारतीवर लावणार असलेस इमारत पूर्णत्वाचा दाखला.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रा मध्ये जाहिरात फलक लावताना परवानगी घेऊन फलक लावणेत यावेत, असे आवाहन आकाश चिन्ह Posted On: 01 August 2017