ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मेट्रोच्या कामाच्या नियोजना अभावी पुण्याकडे जाणा-या मार्गावर वाहतूक कोंडी

निगडी, दि. १ - मेट्रोच्या कामामुळे पिंपरी-चिंचवडकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात पुण्याकडे जाणा-या मार्गावर विविध ठिकाणी मेट्रोच्या कामामुळे खोदून ठेवले आहे. मात्र कामाचे वाहतुकीच्या नियोजनचा अभाव यामुळे शहरवासीयांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.त्याचाच परिणाम म्हणून आज (सोमवारी) दुपारी तीन वाजल्यापासून खराळवाडी येथे वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन कारावा लागत आहे.

बीआरटीएस मार्गावर पार्क केलेली चार चाकीहीनेही यामध्ये भर पडली आहे. तर ग्रेड सोपरेटरचा इन आऊटचा सावळा गोंधल मेट्रोच्या कामामळे अधिक वाढला आहे, त्यात चौकात बेशिस्त उभारलेल्या रिक्षा आदीमुळे पुण्याकडे जाणा-या बीआरटीएस, ग्रेड सेपरेटर तसेच सर्व्हिस रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतुक पोलिस घटनास्थऴी आले आहेत मात्र त्यांनाही नियोजन किती चुकले आहे याची प्रचिती वाहतूक कोंडी पाहून झाली आहे.
यावेळी एका नागरिकांने सांगितले की, बीआरटीएस मधून गाडी लवकर बाहेर काढता येईल म्हणून मी बीआरटीएस मार्गावर गाडी घेतली. कारण माझी मुलगी आजारी असून तिला दवाखान्यात न्यायचे आहे मात्र पुढे कोणी तर गाडी पार्क करुन गेले असल्यामुळे मी माझ्या मुलीला घेवून पाऊण तासापासून या वाहन चालकाची वाट बघत उभा आहे.

तर एकाला पासपोर्ट कार्यालयात अवघ्या दहा मिनीटात पोहचायचे होते. पिंपरी-चिंचवड सारख्या रस्त्यांच्या शहरात सहज शक्य आहे. मात्र वाहतुकीच्या उडालेल्या बोजावा-यामुळे त्याला हे दहा मिनीट पाऊण तासापर्यंत मोजावे लागले आहेत. हीच परिस्थीती चिंचवड पर्यंत आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिस मोट्रो प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली आहे.

तर याचा फटका एका रुग्णवाहिकेला देखील बसला आहे. रुग्णवाहीकेतील रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयात पोचवण्यासाठी चालकाने गाडी ग्रेड सेपरेटरमधून घेतील. परंतु खराळवाडी येथे वाहतूक कोंडी झाल्याने रुग्णवाहिका मध्येच आडकली. मोरवाडी येथे ग्रेड सेपरेटरमधून बाहेर पडण्यासाठीची सुविधा आहे. परंतु पुण्याकडे जाणारी वाहने सरळ जाऊन खराळवाडीत वाहतूक कोंडीत आडकली. मोरवाडी येथे ज्या ठिकाणी आऊट आहे त्या ठिकाणी Posted On: 01 August 2017