ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एक्सप्रेस वेवर भरधाव मोटार नाल्यात कोसळली, एक ठार, तिघे जखमी

चिंचवड, दि. २ - भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार झाडांना धडकून नाल्यामध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला. तर, तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात आज (बुधवारी) पहाटे तीनच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पाटण गावाजवळ घडला.

संदिपान भगवान शिंदे (वय ६०, रा. बीड), असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, सुभाष साहेबराव जगताप (वय ७०), किसन जठार (वय ७१) आणि मुक्ताराम किसन तावरे (वय ७१, सर्व रा. बीड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावरून इनोव्हा (एमएच २३ एके ३८८८) या मोटारीतून मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होते. पाटण गावाजळून येत असताना भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या खाली उतरून तीन झाडांना जोरात धडकली आणि नाल्यात कोसळली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.