ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कासारवाडीच्या अल्फा लावल कंपनीतील कामगारांचे आंदोलन

कासारवाडी, दि. ३ - चार वर्षांपूर्वी कासारवाडी येथील अल्फा लावल कंपनी प्रशासनाने ४०२ कर्मचा-यांना अचानक काढून टाकले. या निर्णयाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी मागील चार वर्षांपासून पाठपुरावा केला. परंतु कंपनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेतर्फे आज सकाळपासून पुन्हा कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन पुकारले आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर कासारवाडी येथील अल्फा लावल कंपनी प्रशासनाने कंपनीतील ४०२ कर्मचा-यांना १ ऑक्टोबर २०१३ रोजी अचानक घरचा रस्ता दाखवला. मागील चार वर्षांपासून कर्मचारी विविध मार्गाने कंपनी प्रशासनास विनंती करीत आहेत. राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेतर्फे आज सकाळपासून पुन्हा कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन पुकारले आहे.

याबाबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी सांगितले की, अल्फा लवाल कंपनीतील कामगारांनी कामगार संघटना तयार केली; याचा राग धरून कंपनीने ही कारवाई केली आहे. त्यामुळे अचानक घरी पाठवण्यात आलेल्या कामगारांच्या घरावर आर्थिक कु-हाड कोसळली आहे. कामगारांनी अनेक मार्गांनी कंपनी प्रशासनाला घरी बसवण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत विनंती केली, परंतु कंपनी प्रशासनाने त्यावर जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव कामगारांना धरणे आंदोलन करावे लागत आहे.

भोसले म्हणाले की, अल्फा लवाल कंपनीत कंत्राटी कामगार भरतीला बंदी आणण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. त्या आदेशांना जुमानता कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वी ४०२ कामगारांवर जी वेळ आली तीच वेळ सध्या कार्यरत असलेल्या कामगारांवर देखील येणार आहे. त्यामुळे कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन करण्यात येणार आहे.