ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आंदोलनातील शेतक-यांवरील गुन्हे मागे घेणार - अर्थमंत्री मुनगंटीवार

तळेगाव, दि. ४ - मावळ गोळीबार प्रकरणातील आंदोलनातील शेतक-यांवरील गुन्हे सरकार मागे घेणार आहे. ऑगस्ट रोजी हे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे, अशी माहिती मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी दिली.

आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची आज (गुरुवारी) भेट घेऊन शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. मुनगंटीवर यांनी त्वरित गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर शेलार, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, भाजपचे मावळ प्रभारी भास्करराव म्हाळसकर, आरपीआयचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, भाजप अध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेना मावळ विभाग प्रमुख राजू खांडभोर, शिवसेना ज्येष्ठ नेते भारत ठाकूर, भाजयुमेचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, कार्याध्यक्ष अजित आगळे, राजेश मु-हे, संदीप भुतडा, मधुकर धामणकर, रामा गोपाळे, संभाजी म्हाळसकर तसेच आंदोलक शेतकरी उपस्थित होते.

ऑगस्ट २०११ रोजी पवना धरणातून भुमिगत जलवाहिनीच्या विरोधात शेतकर्‍यांनी पुणे-मुंबई महामार्गावर  आंदोलन केले होते. आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतकर्‍यांचा बळी गेला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मावळातील सुमारे १९० शेतक-यांवर गुन्हे दाखल केले होते.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यासोबत आमदार बाळा भेगडे आणि शेतक-यांची मुंबईत बैठक झाली. यावेळी मुनगंटीवर म्हणाले, आमदार भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन हे अत्यंत योग्य होते. आंदोलक शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. नुकसानी बाबत चुकीची माहिती देऊन आंदोलक शेतक-यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. चुकीच्या मार्गाने नोंदविलेले गुन्हे निश्चितपणे मागे घेण्यात येतील. आठ ऑगस्ट रोजी बैठक घेऊन गुन्हे मागे घेण्यात