ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चिंचवड लिंक रोड येथे कारची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

चिंचवड, दि. ८ - चिंचवड येथील लिंकरोड परिसरात एका अज्ञात कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.) सायंकाळी सव्वासहा वाजता घडली. जयप्रकाश शिवनारायण तोतले (वय ६६ रा.मोरया गोसावी, राजपार्क, चिंचवड गाव), असे मयत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

याप्रकरणी तोतले यांचा मुलगा सुहास तोतले यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोतले हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात कार चालकाने वाहतुकीच्या नियमांना मोडत बेदरकारपणे गाडी चालवत तोतले यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये तोतले गंभीर जखमी झाले.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.