ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पवना प्रकल्प रद्द झाल्यानंतरच आंदोलन पूर्ण होणार - आमदार बाळा भेगडे

चिंचवड, दि. ९ - पवना जलवाहिनी प्रकल्प पूर्णपणे रद्द झाल्यानंतरच पवना बंद जलवाहिनी विरोधी आंदोलन पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प कायमचा बंद होण्यासाठी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, असे मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे म्हणालेपवना बंद जलवाहिनीच्या विरोधात ऑगस्ट २०११साली पुकारलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबारात येळसे येथील कांताबाई ठाकर, शिवणे येथील मोरेश्वर साठे सवडली येथील श्यामराव तुपे या तीन बळीराजांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेस आज (बुधवारी) सहा वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हुतात्म्यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त पवनानगर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भेगडे बोलत होते.

येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून क्रांतीज्योती मिरवणुकीचे सभास्थळी आगमन झाले. येळसे येथील श्रद्धांजली सभेला आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, शंकरराव शेलार, बाळासाहेब जांभूळकर, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, शिवसेनेचे भारत ठाकूर तसेच भास्करराव म्हाळसकर, तळेगावचे माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, उपसभापती शांताराम कदम, माजी सभापती एकनाथ टिळे, भाऊ गुंड, रवींद्र भेगडे, अविनाश बवरे, गणेश भेगडे आदी उपस्थित होते.

१९० शेतकऱ्यांवरील जीवे मारण्याचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे मागे घेण्याबाबत क्रांतिकारक निर्णय घेतल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार मंत्रीगटाच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले. ७० लाख नुकसान भरपाई भरण्याची मागणी होती पण एक रुपयाही भरणार नसून गोळीबारातील जखमींना, दिव्यांगांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार भेगडे यांनी सांगितले.

श्रद्धांजली सभेत राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. आपल्या संदेशात मुनगंटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांना आनंदाने जगता येईल Posted On: 09 August 2017