ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आदेशाला केराची टोपली दाखविणा-या उद्यान अधीक्षकाला सक्त ताकीद

चिंचवड, दि. १० - माहितीच्या अधिकारात नागरिकांना आवश्यक माहिती देण्याबरोबरच आयुक्तांनाही तब्बल एकोणीस दिवसांनी खुलासा देत आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणा-या उद्यान अधीक्षक आणि मुख्य कारकुनाला आयुक्तांनीच सक्त ताकीद दिली आहे.

प्रकाश मोगल गायकवाड असे उद्यान अधीक्षकाचे तर लक्ष्मण तुकाराम डगळे असे मुख्य लिपिकाचे नाव आहे. गायकवाड हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागात उद्यान अधीक्षक तथा वृक्षसंवर्धन विभागाचे जन माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन शशिकांत यादव यांनी त्यांच्या संस्थेशी संलग्न असलेल्या अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समितीमार्फत उद्यान विभागाशी संबंधित माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती. ही माहिती मुदतीत देता उलट माहितीसाठी एक लाख रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले.

माहिती मिळाल्याने यादव यांनी केलेले अपील निकाली काढणे, अपील सुनावणीला गैरहजर राहणे, अर्जदाराला भयभीत करणे, धमक्या देणे, नागरिकांशी गैरवर्तन करणे आदी बाबी घडल्या. त्यावर नितीन यादव यांनी आयुक्तांकडे तक्रार केली असता त्यांनी अतिशीघ्रतेने अहवाल सादर करण्याचे आदेश गायकवाड यांना दिले. मात्र, या आदेशालाच केराची टोपली दाखवित गायकवाड यांनी अहवाल सादर करण्यास तब्बल एकोणीस दिवस विलंब लावला.

त्यामुळे गायकवाड आणि मुख्य कारकून डगळे यांची शासकीय सेवक म्हणून कर्तव्यपरायणता संशयास्पद, हलगर्जीपणाची आणि अशोभनिय आहे, असा आरोप ठेवत या दोघांनाही सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यापुढे कार्यालयीन कर्तव्यपालनात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.